esakal | पत्नीने दुसरा विवाह केला नसेल तर पतीच्या मालमत्तेमध्ये हिस्सा - हायकोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai High Court

पत्नीने दुसरा विवाह केला नसेल तर पतीच्या मालमत्तेमध्ये हिस्सा - हायकोर्ट

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : पतीचे निधन (husband death) होईपर्यंत पत्नीने दुसरा विवाह (wife second marriage) केला नसेल तर पतीच्या मालमत्तेमध्ये पत्नीचा हिस्सा असतो असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) दिला आहे. मृत मुलाच्या आईने सुनेविरोधात केलेल्या याचिकेवर नागपूर (Nagpur high court) उच्च न्यायालयाचे न्या एस एम मोडक यांनी निकाल दिला आहे. दिवंगत मुलगा आणि सून कौटुंबिक वादामुळे वेगळे रहात होते. मात्र तरीही पत्नीने दुसरा विवाह केला नव्हता आणि घटस्फोटदेखील घेतला नव्हता. एप्रिल1991 मध्ये मुलाचा अपघाती मृत्यू झाला. तो भारतीय रेल्वेमध्ये कामाला होता. त्यानंतर एका महिन्याने पत्नीने दुसरा विवाह केला.

हेही वाचा: बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपींचा जामीन हायकोर्टाने फेटाळला

सन 1993 मध्ये आईने त्यांच्या नोकरीतील मृत्यूनंतरच्या आर्थिक भत्त्यांसाठी दावा केला आणि सुनेने दुसरे लग्न केल्याची माहिती रेल्वे विभागाला दिली. मात्र रेल्वेने सुनेला आर्थिक भत्ते देण्याचा निर्णय दिला. याविरोधात आईने पुन्हा स्थानिक दिवाणी न्यायालयात दावा केला. न्यायालयाने आई आणि सुन दोघांना आर्थिक भत्ते विभागून देण्याचे आदेश दिले. या निर्णयाविरोधात पुन्हा आईने नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

हिंदू वारसा कायद्याच्या कलम 24 नुसार जर पत्नीने दुसरा विवाह केला तर ती पतीच्या मालमत्तेत अपात्र ठरु शकते, मात्र संबंधित प्रकरणात पत्नीने पुर्नविवाह केला नाही आणि घटस्फोट घेतला नाही. त्यामुळे पत्नी म्हणून ती वारस ठरते, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. तसेच या मालमत्तेमधील (आर्थिक भत्ते) अर्धा हिस्सा आईला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

loading image
go to top