esakal | नैसर्गिक वाढीसाठी मुलांचा ताबा आईकडे असणे आवश्यक | Mother
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai High Court

नैसर्गिक वाढीसाठी मुलांचा ताबा आईकडे असणे आवश्यक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लहान वयात मुलांच्या नैसर्गिक वाढीसाठी (children grown up) त्यांचा ताबा आईकडे (mother) असणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) वडिलांना मुलाचा ताबा देण्यास नकार दिला. टीव्ही अभिनेत्री असलेल्या आईला न्यायालयाने मुलाचा ताबा सोपवला आहे. आई मुलाचा सांभाळ करू शकणार नाही, असे सकृतदर्शनी आढळत नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले आहे.

हेही वाचा: BMC : तीन सदस्यीय प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान

लहान वयात मुलांच्या विकासासाठी आईची साथ असणे आवश्यक असते. आईचे प्रेम, काळजी आणि सुरक्षा वडिलांकडून मिळेल अशी अपेक्षा नाही. त्यामुळे वडिलांच्या नातेसंबंधात फरक पडत नाही, असे निरीक्षण न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांनी व्यक्त केले. मुलांना आई आणि वडील दोघांच्या प्रेमाची अन् आधाराची आवश्यकता असते, हेदेखील खरे आहे. त्यामुळे दर दिवशी व्हिडीओ कॉलद्वारे मुलाला वडिलांशी बोलायला द्यावे आणि आठवड्यातून दोन दिवस प्रत्यक्ष भेट घेऊ द्यावी, असे निर्देश न्यायालयाने आईला दिले आहेत.

पडद्यावर विविध भूमिका करणारी आई प्रत्यक्षात मुलांच्या विकासासाठी चांगली भूमिका पार पाडेल आणि वडीलही मुलाच्या हितासाठी विचार करतील, असेही खंडपीठ म्हणाले.
याचिकादार वडिलांनी मुलासाठी अभिनय क्षेत्र सोडून त्याची देखभाल करणार आहे, अशी हमी याचिकेत दिली होती. मुलाची आई व्यावसायिक कामामुळे व्यस्त असते. त्यामुळे ती देखभाल करू शकत नाही, असा दावा करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने तो अमान्य केला. फक्त व्यावसायिक कामाचा निकष ठेवून मुलाचा ताबा कोणाला द्यायचा हे ठरवता येणार नाही, असे खंडपीठ म्हणाले.

loading image
go to top