Mumbai High court
Esakal
मुंबई : केवळ पितृत्वाबाबत वाद आहे म्हणून डीएनए चाचणीचे आदेश देता येणार नाहीत. या चाचणीची मागणी करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने आपल्या दाव्याचा आधार सिद्ध करण्यासाठी प्रथम पुरावे सादर करणे आवश्यक आहे. मुळात डीएनए चाचणी नियमित चाचणी नसून विशेष कारणास्तव केली जाणारी चाचणी असल्याचे न्यायालयाने म्हटले आणि नाशिक कनिष्ठ न्यायालयाचे डीएनए चाचणीचे आदेश रद्द केले.