Mumbai High Court
esakal
मुंबई : महामुंबई परिसरातील खराब रस्त्यांचे कदापि समर्थन करता येणार नाही. नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देणे हे महापालिका आणि राज्य सरकारचे कर्तव्य आहे. खड्डे तसेच उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने मृत्यू झाल्यास नातेवाईक आणि जखमी भरपाईसाठी पात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. १३) दिला. यानुसार मृतांच्या नातेवाइकांना सहा लाख रुपये, तर जखमींना दुखापतीनुसार ५० हजार ते अडीच लाख भरपाई देण्याचे आदेश दिले.