मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील नियमभंगावर कठोर ताशेरे ओढले आहेत. आंदोलनाला परवानगी देताना ठरलेल्या अटींचं सर्रास उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत कोर्टाने जरांगे पाटलांना सयंम ठेवण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. या प्रकरणी राज्य सरकारने कोर्टात सादर केलेल्या माहिती आणि फोटोंमुळे आंदोलनाचं गांभीर्य आणि त्याचा मुंबईकरांवर होणारा परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.