esakal | रोहित पवारांची आमदारकी धोक्यात? न्यायालयाने बजावली नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित पवारांची आमदारकी धोक्यात? न्यायालयाने बजावली नोटीस

रोहित पवारांची आमदारकी धोक्यात? न्यायालयाने बजावली नोटीस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार. रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावला आहे. रोहित पवार यांच्या आमदारकीविरोधात माजी मंत्री राम शिंदे आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलेत. आमदार रोहित पवार यांच्याविरोधात राम शिंदे यांनी 'इलेक्शन पिटिशन' म्हणजेच 'निवडणूक याचिका' मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीये. यामध्ये राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. निवडणूक अटी आणि शर्थींचा भंग केल्याचे हे सर्व आरोप आहेत. 

मोठी बातमी - मोदींची पुन्हा तुलना छत्रपतींशी! वाचा आता कोण काय बोललंय...

'इलेक्शन पिटिशन'मध्ये करण्यात आलेले आरोप :

  • साखर कारखान्यातील शंभर कर्मचाऱ्यांचा निवडणूक काळात वापर करणे 
  • या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटप करणे 
  • WhatsApp मेसेजेसचा वापर करून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्रभावित करणे 
  • निवडणुकांच्या काळात 'करप्ट प्रॅक्टिस' करणे

मोठी बातमी - शीsss ! ते प्रवासी पीत होते ट्रेनच्या टॉयलेटमध्ये भरलेलं पाणी..
 

ऍडव्होकेट तळेकर यांनी माजी मंत्री राम शिंदे यांची बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडली आहे.  राम शिंदे यांचे वकील तळेकरांनी युक्तिवाद करताना, "निवडणूक काळात काही कर्मचारी, कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगे हात पकडलं होतं, त्या-त्या वेळेस निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाली देखील केलेलं", असं सांगितलंत. 

दरम्यान, याप्रकरणी आता आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने १३ मार्चपर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे. आता आमदार रोहित पवार यांनी आपली बाजू मांडल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

mumbai high court summonsed ncp mla rohit pawar

loading image
go to top