वाढीव वीजबिलांविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यालयाने दिला निकाल, हायकोर्ट म्हणतंय...

सुमित बागुल
Tuesday, 14 July 2020

लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलाय

मुंबई : मुंबईत आणि सोबतच संपूर्ण राज्यात लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आधीच कामधंदा बंद असल्याने आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागतोय. अशातच सरासरी काढून आलेल्या वीजबिलांमुळे वीज ग्राहकांना वीज नियामक महामंडळाकडून मोठा शॉक मिळालाय. केवळ सामान्य नागरिकच नाही तर सेलिब्रिटीजला देखील वारेमाप वीजबिलं आल्याने मोठा गदारोळ माजलाय.

संपूर्ण राज्यभरात हा प्रकार घडल्याने याबाबतीत सर्वच स्तरातून वीज नियामक महामंडळावर टीका देखील झाली. दरम्यान याविरोधात मुंबई उच्च न्यालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल दिलाय.  

मोठी बातमी - कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा देणे बंधनकारक करा; वाचा कोणी केलीय आहे ही मागणी

लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलाय.  लॉकडाऊन दरम्यान आलेल्या भरमसाठ वीजबिलांबाबत थेट दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय. वाढीव बिलांसंदर्भात महाराष्ट्र वीज नियामक मंडळाकडे दाद मागा, असं मुंबई हायकोर्टाने स्पस्ट केलंय.

या सोबतच मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाला देखील आलेल्या तक्रारींवरती ताबडतोब कारवाई करा असे आदेश दिलेत. मुबईतील मुलुंड भागात राहणाऱ्या रवींद्र देसाई या व्यावसायिकाने वाढीव वीजबिलासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यावर मुंबई उच्च न्यायालयाने आज निकाल दिलाय.  

mumbai highcourt directs consumers to reach to MSEB for their queries related to bill


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai highcourt directs consumers to reach to MSEB for their queries related to bill