esakal | मुंबईत क्वारंटाईनच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या नवे नियम
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत क्वारंटाईनच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या नवे नियम

पालिकेनं कोरोना रुग्णांच्या क्वारंटाईनच्या नियमावलीत मोठा बदल केला आहे.  नवीन नियमानुसार ५० वर्षे आणि त्या पुढील वयाच्या कोरोना रुग्णांना आता घरी विलगीकरणात राहता येणार नाही.

मुंबईत क्वारंटाईनच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या नवे नियम

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून कोरोना व्हायरस मुंबईत तळं ठोकून आहे. गेल्या महिन्यापासून मुंबई शहर कोरोनासारख्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई शहरात आढळून आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून अजूनही विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना नियंत्रणात येताना दिसत आहे. मुंबईतली कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आलं आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेनं कोरोना रुग्णांच्या क्वारंटाईनच्या नियमावलीत मोठा बदल केला आहे.  नवीन नियमानुसार ५० वर्षे आणि त्या पुढील वयाच्या कोरोना रुग्णांना आता घरी विलगीकरणात राहता येणार नाही.

५० वर्षांवरील सर्व बाधित रुग्णांना आता घरीच अलगीकरण करण्याची सूट मिळणार नाही. वयाची पन्नाशी पार केलेल्या सर्व कोरोनाबाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागणार आहे.  या रुग्णांना कोणतीही लक्षणं नसली मात्र त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर त्यांना ccc2 म्हणजेच कोविड केअर सेंटर मध्ये रहावं लागेल. तसेच अशा रुग्णांच्या घरी आणि इमारत किंवा चाळीच्या कॉमन जागांवर पालिकेकडून  सॅनिटाझेशन करण्यात येईल.

अधिक वाचाः  पत्रकारांनी 'तो' प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंनी जोडले हात, जाणून घ्या नेमकं काय घडलं

कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत ७३११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र यामध्ये ८० टक्के मृत्यू ५० हून अधिक वयोगटात आढळून आलेत. त्यामुळे पालिकेनं याची गंभीर दखल घेतली आहे.  याआधी सौम्य लक्षणे असलेल्या ६० वर्षे वयापर्यंतच्या व्यक्तींना घरी राहता येत होतं. याबाबत पालिकेने नवं  परिपत्रक काढलं आहे. तसंच होम आयसोलेशनचे नियम बदलले आहेत.

हेही वाचाः  गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट! बाजारात गर्दी असली तरी; विशेष खरेदीकडे गणेशभक्तांची पाठ

६ हजार रुग्ण ५० वर्षांवरील असून ६० ते ६९ या वयोगटात २,०१२ मृत्यू झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी असणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडाच्या आजाराचे प्रमाण अधिक असते. महापालिकेने आता ५० वर्षांवरील सर्व व्यक्तींना तात्काळ चांगले उपचार मिळावे, यासाठी धावपळ सुरू केली आहे. 

दरम्यान परदेशातून एअर लाइन्सने मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना टेस्ट करण्यात येईल. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितल्यानुसार परदेशातून मुंबईत दाखल होणाऱ्यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य असणार आहे.

Mumbai home isolation rules for covid 19 patients aged above 50

loading image
go to top