मुंबई - पंचमहाभुते फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, शिवाजी पार्क येथे रविवारी (ता. १५) मुंबई फळोत्सवाचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मॉँ के नाम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र यापासून प्रेरणा घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.