
उरण, ता. २१ (बातमीदार) : मोरा ते मुंबई व करंजा ते रेवस जलप्रवास करताना प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. अनेक वेळा अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. मार्च महिन्यात महाशिवरात्रीला एलिफंटावरून येणारी फेरी बोट मोरा बंदरातील गाळात अडकल्याने प्रवाशांना मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर काही दिवस काळजी घेऊन पुन्हा ये रे माझ्या मागल्या हा प्रकार सुरू झाला आहे.
मुंबई ते उरण या महत्त्वपूर्ण प्रवासात उरण येथील मोरा बंदर; तर उरण-अलिबाग या प्रवासात करंजा बंदर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.