
मुंबईतील हिरानंदानी गार्डन्स येथे राहणाऱ्या 82 वर्षीय निवृत्त आयआयटी प्राध्यापकाची घरकामगार महिलेनं फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेनं प्राध्यापकाचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 1.12 कोटींची रोकड आणि दागिने लुटले, तसेच 6 कोटी रुपये किमतीच्या चार फ्लॅट्सच्या एक-तृतीयांश हिस्स्यावर कब्जा केला. यानंतर तिनं प्राध्यापकाला विक्रोळी येथील वृद्धाश्रमात दाखल केलं. या प्रकरणी पवई पोलिसांनी आरोपी घरकामगार महिला निकिता विजय नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.