मुंबई : गोवरच्या रुग्णांची संख्येत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

measles patients

मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत असून  जानेवारीपासून ते आतापर्यंत 124 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई : गोवरच्या रुग्णांची संख्येत वाढ

मुंबई - मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत असून  जानेवारीपासून ते आतापर्यंत 124 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या नव्या 15 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, रुग्ण दाखल करण्याची सुविधा वाढवण्याची सुचना केंद्रीय पथकाने दिली आहे. केंद्रीय पथकाने आज राज्य शासनाच्या प्रमुख सचिवांना तसेच अतिरिक्त आयुक्त यांना मुंबईतील गोवर उद्रेकाच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली व काही सुचना दिल्या आहेत.

पथकाने दिलेल्या सुचना -

 • उद्रेक असलेल्या विभागात सर्वेक्षणासह दररोज ताप व पुरळ आलेल्या नवीन रुग्णांचा शोध घेणे

 • लक्षण आढळलेल्या रुग्णांचा दुसऱ्या दिवशी पाठपुरावा करणे

 • अतिरिक्त लसीकरण सत्राचे आयोजन

 • रुग्ण दाखल करण्याची सुविधा वाढवणे

 • आरोग्य सेविकांना गोवर आजाराच्या गंभीर लक्षणांबाबत अवगत करणे

 • लसीकरणाबाबत जनजागृती वाढवणे

केंद्रीय पथक हा अहवाल शासनाकडे सादर करणार आहे.

गोवर रुग्णांची संख्या

 • जानेवारीपासून ते 14 नोव्हेंबर-126

 • सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर- 99

 • सर्वाधिक रुग्ण असलेला विभाग - एम पूर्व

 • एम पूर्व विभागातील एकूण घरांचे सर्वेक्षण- 114157

 • मुंबईतील घरांचे सर्वेक्षण- 1092391

 • मुंबईतील ताप व पुरळचे रुग्ण- 908

वर्गीकरण

 • 0 ते 8 महिने - 99

 • 9 ते 11 महिने - 105

 • 1 ते 4 वर्ष- 31

 • 5 ते 9 - 162

 • 10 ते 14 वर्ष -43

 • 15 वर्षांवरील- 6

 • 14 नोव्हेंबर रोजी दाखल रुग्ण-12

कस्तुरबा रुग्णालयात दाखल रुग्ण -

सध्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात ताप व पुरळच्या रुग्णांवर केले जात आहेत. 4 नोव्हेंबर  ते 14 नोव्हेंबर पर्यंत 61 रुग्ण दाखल झाले आहेत. या 61 रुग्णांपैकी 8 मुले 0ते 8 वयोगटातील आहेत. 9 ते 11 महिन्यातील 5, 1 ते 4 वयोगटातील 31, 5 ते 9 वयोगटातील 14, 10 ते 14 वयोगटातील 0, आणि 15 वर्षांवरील एकूण 3 रुग्ण दाखल आहेत.  तर, 6 मुलांवर  ऑक्सिजन वर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत एम पूर्व विभागातील एम आर 1 चे 1261 तर  एम एम आर साठी 1054 बालकांचे लसीकरण झाले आहे.  तर, संपूर्ण मुंबईतील एम आर 1 साठी 5972 आणि एम एम आर साठी 4544 बालकांचे लसीकरण झाले आहे.