Mumbai : कोकेन तस्करी प्रकरण..नायजेरीयन नागरिकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

Mumbai : कोकेन तस्करी प्रकरण..नायजेरीयन नागरिकाला अटक

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केल्याप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) रविवारी एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. डीआरआयने शनिवारी 1,794 ग्रॅम कोकेनसह 27 वर्षीय केनियन पुरुष आणि 30 वर्षीय महिलेला अटक केली होती याच प्रकरणात तिसऱ्या नायजेरीयन नागरिकाला अटक केली . आरोपीला रविवारी अटक करण्यात आली आरोपी इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानाने प्रवासी आदिस अबाबाहून आले होते.तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायलयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन परदेशी नागरिकांकडून 18 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले होते.डीआरआयच्या म्हणण्यानुसार, डीआरआय, मुंबईला मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, 3 डिसेंबर रोजी इथोपियन एअरलाइन्सच्या ईटी-640 फ्लाइटने अदिस अबाबाहून शहरात आलेल्या दोन प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखण्यात आले.

त्यांच्या सामानाची तपासणी केली असता चार पिशव्या सापडल्या. पिशव्या तपासणी साठी उघडल्या आसता पिशव्यांमधून पावडरयुक्त पदार्थ असलेले एकूण 8 प्लास्टिक पाऊच जप्त करण्यात आले. पावडर पदार्थाची चाचणी करण्यात आली तेव्हा कोकेन असल्याचे चाचणीत निष्कर्ष आला. निष्कर्षनंतर दोन्ही दोन्ही प्रवासी परदेशी नागरिकाना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या पैकी एक पुरुष 27 वर्षांचा केनियाचा आणि एक महिला 30 वर्षांची गिनीची आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाचे वजन 1.7 किलो असून, त्याची किंमत अंदाजे 18 कोटी आहे