Mumbai : अमली पदार्थ तस्करांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट एनसीबीच्या अटकेत; 3 विदेशी नागरिक

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अंमली पदार्थ जप्त आणि 4 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव एस. वर्गानोवा असून 1980 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती आहे. दुसरा रशियन नागरिक आंद्रे हा रशियन पोलिसातील माजी अधिकारी आहे.
mumbai
mumbaisakal

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने गोव्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलचा पर्दाफाश केला असून 2 विदेशी नागरिकासह 3 आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये ऑलिम्पिक पदक विजेता रशियन जलतरणपटू आणि माजी रशियन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अंमली पदार्थ जप्त आणि 4 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव एस. वर्गानोवा असून 1980 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती आहे. दुसरा रशियन नागरिक आंद्रे हा रशियन पोलिसातील माजी अधिकारी आहे.

रशियन नागरिकांसह आकाश नावाच्या भारतीय नागरिकाला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईत एलएसडीचे 88 ब्लॉट्स, 8.8 ग्रॅम कोकेन, 242.5 ग्रॅम चरस, 1.440 किलो हायड्रोफोनिक गांजा, 16.49 ग्रॅम हॅश ऑइल, 410 ग्रॅम हॅश केक आणि 4.88 लाख रुपयांची रोकड जप्त केले आहे.

आरोपी ओलिपिक मेडल विजेता

अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे की 1980 ची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती जलतरणातील एस. वर्गानोवा आणि आंद्रे म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका व्यक्तीचे नाव आहे, जो माजी रशियन पोलिस होता. आंद्रे हा गोव्यात अनेक दिवसांपासून अंमली पदार्थांचा व्यापार चालवत होता. आपले जाळे पसरवण्यासाठी तो अनेक शहरांमध्ये जाऊन अमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क चालवत होता. रशियन नागरिकांसह आकाश या स्थानिकालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

mumbai
Pune : महापालिका वारंवार पाणी बंद का करते ?

पाळत ठेऊन कारवाई

एनसीबीच्या मुंबई युनिटने गेल्या दोन आठवड्यात ही पाळत ठेवून कारवाई केली आहे. गोव्यातील आरंबोल आणि आसपासच्या भागात रशियन ड्रग टोळी कार्यरत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर माहितीनुसार तपास सुरू करण्यात आला. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक रशियन महिलेचा या टोळीत समावेश आहे.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक रहिवासी आकाशचा सहभाग उघड झाला. अधिक तपासात असे दिसून आले की आकाश एका मोठ्या ड्रग नेटवर्कचा भाग असून रशियन नागरिकांच्या सहकार्याने काम करतो.

mumbai
Mumbai Firing : मुंबईत ३१ वर्षीय महिलेवर गोळीबार; घटनास्थळी पोलिस दाखल

त्यानंतर लगेचच आकाशवर तपास यंत्रणांकडून पाळत ठेवण्यात आली. सविस्तर तपासानंतर रशियन व्यक्ती आंद्रेचे नाव समोर आले. त्याच्यावर एनसीबीने कारवाई करून त्याच्याकडून एलएसडी अमली पदार्थ जप्त करण्यात आला. आंद्रे त्याच्या स्थानिक राहत्या घरी तो 'हायड्रोफोनिक' पद्धतीने गांजा पिकवत असल्याचे चौकशीत समोर आलेआहे.

लाखोंची रोकड व अमली पदार्थ

संपूर्ण कारवाईदरम्यान, एनसीबीने एलएसडीचे 88 ब्लॉट्स, 8.8 ग्रॅम कोकेन, 242.5 ग्रॅम चरस, 1.440 किलो हायड्रोफोनिक गांजा, 16.49 ग्रॅम हॅश ऑइल, 410 ग्रॅम हॅश केक आणि 4.88 लाख रुपयांची रोकड जप्त केली. एनसीबीने त्यांच्याकडून भारतीय आणि विदेशी चलन, बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे आणि हायड्रोफोनिक गांजाच्या उत्पादनाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com