esakal | धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडेंना NCB मध्ये मुदतवाढ | Sameer Wankhede
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede

धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडेंना NCB मध्ये मुदतवाढ

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (drug case) केलेल्या कारवाईमुळे चर्चेत असलेले एनसीबीचे (ncb) अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. समीर वानखेडे हे २००८ बॅचच्या भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. त्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. वानखेडे सध्या मुंबई एनसीबी युनिटचे झोनल संचालक आहेत.

समीर वानखेडे आधी डीआरआयमध्ये कार्यरत होते. त्यांना मागच्यावर्षी एनसीबीमध्ये आणण्यात आले. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी सहा महिन्यांसाठी त्यांना एनसीबीमध्ये आणण्यात आले होते. आता कॉर्डिलिया क्रूझमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईमुळे ते चर्चेत आहेत. या प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खान अटकेत आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. 'द फ्री प्रेस जर्नल'ने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: NIA अ‍ॅक्शन मोडमध्ये, काश्मीर, दिल्ली, यूपीमध्ये १८ ठिकाणी छापे

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणावरुन जोरदार राजकारणही रंगलं आहे. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्वत: समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याबद्दल पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. आपल्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात समीर वानखेडेंनी धडाकेबाज कारवाई करुन दाखवली आहे.

हेही वाचा: केरळात लिंग बदलणाऱ्यांची संख्या वाढली; पुरुषापेक्षा 'महिला' होण्याची अधिक इच्छा

त्यांनी अनेक ड्रग्ज तस्करांवर कारवाई करत ड्रग्ज व्यवहाराची साखळी मोडण्याचा प्रयत्न केला. डीआरआय मध्ये नियुक्ती होण्यापूर्वी समीर वानखेडे यांनी एअरपोर्ट कस्टम, सर्व्हीस टॅक्स आणि एनआयएमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या कामाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर त्यांची पत्नी आहे.

loading image
go to top