
मुंबई : पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅससह खाद्यतेलाचेही दर गगनाला भिडल्याने त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. लॉकडाऊननंतर पूर्वपदावर येत असलेल्या हॉटेल व्यवसायाला आता महागाईचा फटका बसत आहे. त्यामुळे हॉटेलमधील प्रत्येक पदार्थ १५ ते २० टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीसोबतच एलपीजी गॅसच्या किमतींचाही आलेख वाढत आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे निर्माण झाला आहे.
हॉटेलमधील प्रत्येक पदार्थांच्या किमती एकदम वाढविणे कठीण असते. हॉटेलची प्रसिद्धी, ग्राहक, पदार्थांची गुणवत्ता, परिसर पाहून पदार्थांच्या किमती वाढवल्या जातात. त्यानुसार सरासरी १५ ते २० टक्के किमतीची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी होण्याची चिन्हे आहेत.
वाढत्या महागाईला सामोरे जाण्यासाठी पदार्थांच्या किमती वाढवल्या जाणार आहेत. प्रत्येक व्यावसायिक एकाच वेळी किमती वाढवणार नसून परिस्थितीचा अभ्यास करून त्याबाबत विचार केला जाणार आहे. सध्या प्रत्येक पदार्थावर साधारण १५ ते २० टक्के वाढवण्यात येणार आहेत.
- सुधाकर शेट्टी,सरचिटणीस, आहार संघटना
हॉटेलसाठी लागणाऱ्या प्रत्येक बाबींच्या किमती वाढल्या आहेत. महागाई अशीच वाढतच राहिली, तर दर वाढवावेच लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी होऊन फटका बसण्याची शक्यता आहे.
- मन्नू गौडा, सद्गुरू उपाहारगृह
पेट्रोल, डिझेलसोबतच गॅस, तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रवास करण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
- पीयूष बनसोडे, ग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.