लसीची धास्ती, जे.जे. रुग्णालयात केवळ १३ जण लसीकरणास हजर

पूजा विचारे
Wednesday, 20 January 2021

जे.जे. रुग्णालयात लसीकरणाला मंगळवारी अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी याठिकाणी 100 जणांना लस दिली जाणे अपेक्षित होते.

मुंबईः मुंबईतील जे.जे. रुग्णालय हे कोव्हॅक्सीन लसीकरणाचे शहरातील एकमेव केंद्र आहे.  त्यात जे.जे. रुग्णालयात लसीकरणाला मंगळवारी अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी याठिकाणी 100 जणांना लस दिली जाणे अपेक्षित होते. मात्र, यादीतील 100 लाभार्थ्यांपैकी केवळ 13 आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी हजर होते. ते देखील रुग्णालयातील कर्मचारीच होते.

जे.जे.सह कामा आणि जीटी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना जेजेतील लसीकरण केंद्रावरच पाठविण्याचा प्रस्ताव रुग्णालयाने राज्य आरोग्य विभागाकडे सादर केला आहे.  वरिष्ठ डॉक्टरांच्या पुढाकारानंतर कर्मचारी कोव्हॅक्सीन घेण्यास तयार
जे.जे. समूहातील सुमारे 7 हजार 750 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तर दुसरीकडे सायन रुग्णालयातून नोंदणीकृत वैद्यकीय 8 कर्मचाऱ्यांना जणांना कोरोनाची लस न घेता काल घरी पाठवण्यात आलं आहे. ऑनलाइन लसीकरणाची नोंदणी होऊन देखील या 8 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीचा लाभ आता घेता येणार नाही आहे. 

केंद्र सरकारनं  कोणाला लस द्यावी या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या जारी केल्या आहेत आणि लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन कोविन अॅपमध्ये कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात आहे. कोणाला लस द्यावी आणि कोणाला देऊ नये हे स्पष्ट असलं तरी अशा आजारांची नोंद करण्याची तरतूद कोविन ऍपमध्ये नाही आहे. यामुळे ज्यांना एलर्जी तसेच इतर आजार असलेले लोक लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येत आहेत. लसीकरण केंद्रावर विचारपूस करताना काल 8 जण एलर्जी आणि इतर आजार असलेले आढळून आले आहेत. त्यांना लस दिल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकते म्हणून लस न देता त्यांना परत घरी पाठवण्यात आलं असून पुढील अनर्थ टळला आहे.

हेही वाचाUnmasking Happiness | कोरोनानंतर हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या कार्यक्षमतेत घट

mumbai jj hospital covaxin 13 people present for vaccination


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai jj hospital covaxin 13 people present for vaccination