मुंबई : मुंबई शहरातील अनेक भागांमध्ये अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेले कबुतरखाने (Mumbai Kabutarkhana Ban) आता इतिहासजमा होणार आहेत. राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्याचा विचार करून मुंबई महानगरपालिकेला (Mumbai Municipal Corporation) शहरातील सर्व अधिकृत कबुतरखाने तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मुंबईत ५१ अधिकृत कबुतरखाने असून, त्यांवर कारवाई सुरू झालीये.