मुंबई - कलिना विद्यापीठात बॉम्बस्फोटाची खोटी माहिती देणारा अटकेत

काही काळासाठी विद्यापीठ परिसरात तणाव निर्माण झाला.
Arrested
Arrestedsakal
Summary

काही काळासाठी विद्यापीठ परिसरात तणाव निर्माण झाला.

मुंबईच्या कलिना विद्यापीठात बॉम्बस्फोट होणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्यास बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. सुरज धर्मा जाधव (Suraj Dharma jadhav) असे या आरोपीचे नाव असून तो मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. सुरजने बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मुंबईच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबई विद्यापीठात (Mumbai) १० मिनिटांत बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देणारा फोन केला होता. यानंतर परिसरात घबराहटीचे वातावरण पसरले. यावेळी काही काळासाठी विद्यापीठ परिसरात तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी त्याला माहिती विचारण्यापूर्वीच त्याने फोन कट केला.

Arrested
Jhund: 'सर,रडून दाखवा'; सेटवर एका मुलानं अमिताभना केली होती विनंती

दरम्यान, मुंबई विद्यापीठात केलेल्या या फोननंतर मुंबई पोलिस कामाला लागले. पोलिसांना मिळालेल्या (Mumbai Police) माहितीनंतर, त्यांनी बीकेसी आणि माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाणे परिसरात असलेल्या मुंबई विद्यापीठांची तपासणी केली. बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी केल्यानंतर पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर फोन करणाऱ्याचा पोलिस शोध घेतला. यावेळी तपासात धमकीचा तो फोन सूरज धर्मा जाधव याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सूरजला सांताक्रूझच्या कोलावरी येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

Arrested
Punjab Election Live Updates : सोनू सूदची बहीण पिछाडीवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com