इथून सुटले अन् तिकडे अडकले; मुंबई पोलिसांना गुंगारा देणाऱ्यांची फिल्मी स्टाईल धरपकड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इथून सुटले अन् तिकडे अडकले; मुंबई पोलिसांना गुंगारा देणाऱ्यांची फिल्मी स्टाईल धरपकड

इथून सुटले अन् तिकडे अडकले; मुंबई पोलिसांना गुंगारा देणाऱ्यांची फिल्मी स्टाईल धरपकड

डोंबिवली, ता. 21 - मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील नागरिकांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरायचे. या चोरीसाठी मोटारसायकल देखील चोरीची वापरायचे. मुंबईतील पोलिसांच्या हाती लागता लागता ते वाचले पण कल्याण पोलिसांनी मात्र या चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागताच सर्व पोलीस ठाण्यात या चोरांचा शोध सुरू झाला. मोहने येथे हे आरोपी असल्याची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलीसांनी मोहने येथून सुनील उर्फ सोन्या फुलारे ( वय 20) व गणेश जाधव ( वय 26) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अब्दुल इराणी हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या व सोनसाखळी चोरीच्या घटनांची नोंद झालेली होती. आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात एक 52 वर्षीय महिला पायी चालत जात असताना त्यांना चाकूचा धाक दाखवून आरोपींनी त्यांच्याकडील 60 हजाराची सोनसाखळी चोरून नेली होती.

यात तपास करताना खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक शरद झिने व त्यांच्या पथकास मोहने येथील लहुजीनगर परिसरात हे चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुनील व गणेश यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, मुंब्रा, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर येथे चोरी केल्याचे गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 9 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 11 मोटारसायकल व 60 हजार रु. किंमतीची सोनसाखळी असा एकूण 10 लाखाचा माल हस्तगत केला आहे. यातील एक आरोपी अब्दुल हा अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबईतून सुटले कल्याणमध्ये अडकले

मुंबईतील चुनाभट्टी येथील एक व्हिडिओ पोलिसांना मिळाला आहे. सुनील व त्याचा मित्र अब्दुल यांना पोलीस पकडण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींची गाडी स्लिप झाली. मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना धक्काबुक्की करत ते पळून गेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही याआधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Mumbai Kalyan Police Arrested The Accused On The Basis Of The Cctv Footage Of The Theft Incident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbaithiefkalyan