esakal | Mumbai: महिलांसाठी विशेष लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

मुंबई : महिलांसाठी विशेष लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शनिवारी 09 ऑक्टोबर 2021 रोजी  मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड 19 लसीकरण सत्र भरवण्यात येणार आहे. महिलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी महापालिका विशेष मोहिम आयोजित करुन शनिवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत लसीकरण होणार आहे.

थेट लसीकरण केंद्रावर येऊन महिलांना  पहिला आणि दुसरा डोस घेता येणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्याने ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद राहणार असल्याचे ही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: माध्यमांसोबत वेळ घालवण्यापेक्षा तपास यंत्रणेला माहिती द्या: दरेकर

कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र उद्या शुक्रवारी राबवले जाणार आहे.

मुंबईतील सर्व 227 निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येवून (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील ह्या सत्रात दिली जाणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्या कारणाने ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.

कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध घटकांकरिता विशेष सत्र राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र होणार आहे.

loading image
go to top