मुंबईच्या तलावात येणारे सांडपाणी महापालिका अडवणार, 'हा'आहे प्लॅन

mumbai Lake
mumbai Lakesakal media

मुंबई : नळाचे पाणी पोहोचण्यापूर्वी मुंबईचे तहान भागवणारे तलाव (Mumbai lake) आता दुर्लक्षीत झाले आहे. कचऱ्या बरोबरच सांडपाणीही (dirty water) या तलावांमध्ये सोडले जाते. त्यामुळे तलावांचा उकिरडा झाला (polluted water in lake) असून काळाच्या ओघात अनेक तलावही नामशेष झाले. आता उरलेल्या तलावांचे नशिब पालटण्याची शक्यता आहे. तलावात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी महानगरपालिका (BMC) प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सल्लागारही नियुक्त (advisory committee) करण्यात येणार आहे. (Mumbai lake-dirty water-polluted water in lake-BMC-advisory committee-nss91)

मुंबईत शिव तलाव,कुर्ला येथील शितल तलाव,चारकोप येथील डिगेश्‍वर तलाव या तीन तलावात येणारे सांडपाणी,तसेच बिन पावसाळी प्रवाह रोखण्यासाठी महानगर पालिकेने सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी 99 लाख 99 हजार रुपयांचा खर्च महानगर पालिका करणार आहे.तसा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.हा सल्लगार सांडपाणी अडविण्याचे उपचार सुचविण्या बरोबरच प्रकल्प अहवाल तयार करणे अशी कामे करण्यात येणार आहे.यासाठी 12 महिन्यांचा कालावधी लागणार असून असेही या प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे.

mumbai Lake
कुर्ला: Video चॅटवर गर्लफ्रेंड लग्नाला नाही बोलली, तरूणाने उचललं टोकाचं पाऊल

मुंबईत होते 129 तलाव

मुंबईत 129 असल्याची नोंद आहे.काही वर्षांपुर्वी माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड झाली होती.यातील आता 50-60 तलाव जिवंत आहे.इतर तलावांमध्ये भरणी टाकून त्यावर अतिक्रमण करण्यात आले.तर,काही तलावात भरणी टाकून त्यावर मैदाने तयार करण्यात आली.तसेच,मुंबईतील गिरण्यांमध्येही तलावं होती.मात्र,गिरण्या संपल्यावर हे तलावही नामशेष झाले आहे.आता मुंबईत किती तलाव उपलब्ध आहेत याची ,,,कत्रित माहिती उपलब्ध नाही.ब्रिटीश काळापासूनच मुंबईत नळाने पाणी पुरवठा होण्यास सुरवात झाल्यावर तलावांचे महत्व कमी होऊन ते बुझवण्यास सुरवात झाली.याचे उदाहरण म्हणजे फोर्ट येथील धोबीतलाव आणि ग्रॅन्टरोड येथील गवालीया टँक आता ऑगस्ट क्रांती मैदान.

म्हणून पालिकेला सुचले शहाणपण

हरीत लवादाने मुंबईत नैसर्गिक जलस्त्रोतात येणाऱ्या सांडपाण्याच्या मुद्यवरुन पालिकेने कान पिळले आहे.या उपाय योजना होत नाही तो पर्यंत पालिकेला रोज 20 लाख रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच,100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होईल असा आराखडा तयार करण्याचे आदेश हरीत लवादाने दिले आहे.त्यानुसार पालिका आता काम करत आहे.

सौर्द्यकरण म्हणजे कॉक्रिटीकरण

महानगरपालिकेने आता पर्यंत अस्तीत्वात असलेल्या तलावांच्या सौदर्यकरणासाठी महानगर पालिकेने कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे.मात्र,यात प्रामुख्याने तलावांच्या परीसरात कॉक्रिटीकरण करण्यात आले.प्रत्यक्षात तलावात येणारे सांडपाणी रोखण्याची गरज होते.ते काम अाता पालिका करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com