esakal | थेंबे थेंबे तळे साचे...मुंबईत मात्र पावसाची ओढ अनं तळे झाले रिकामे!
sakal

बोलून बातमी शोधा

lake water

थेंबे थेंबे तळे साचे...अनं मुंबईत तळे झाले रिकामे!

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : मुंबईत (Mumbai) पाहाटेच्या सुमारास पावसाने (Rainfall) चांगलाच जोर धरला होता. मात्र,ठाणे जिल्ह्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये (Lake) पावसाने ओढच दिली होती. सकाळी 6 वाजेपर्यंत विहार तलावाच्या क्षेत्रात (Lake Area) 110 मि.मी आणि तुळशी तलावाच्या क्षेत्रात 67 मि.मी पावसाची नोंद झाली. मात्र,ठाणे जिल्हयातील तलावांमध्ये तुरळक पावसाची (Little Rainfall) नोंद झाली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कालच्या पेक्षा कमी झाला आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजल्याच्या सुमारास मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 2 लाख 51 हजार 119 दशलक्ष लिटर पाणीसाठा (Water level) होता. तर,आज सकाळी 6 वाजे पर्यंत हा पाणीसाठा 2 लाख 49 हजार 459 दशलक्ष लिटरपर्यंत आला होता. 2019 मध्ये आजच्याच दिवशी 7 लाख 6 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. ( Mumbai lakes having less water as heavy rainfall is not there-nss91)

हेही वाचा: बेकायदा विदेशी कार विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक

तलावातील पाण्याची पातळी (मिटर मध्ये) आणि पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

तलाव - पुर्ण भरल्यावर पातळी - आजची पातळी - पाणीसाठा

अप्पर वैतरणा - 603.51----592.66----00

मोडकसागर - 163.15---149.68---32800

तानसा - 128.63---122.50----44038

मध्य वैतरणा - 285.00---238.89---19503

भातसा - 142.07---114.02---125465

विहार - 80.12---78.66----7569

तुलसी (11 वाजता पुर्ण भरल्यानंतर)---139.17---139.17---8064

loading image