
मुसळधार पावसाने मुंबई आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढले आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) ते कुर्ला आणि मेन लाईनवरील कुर्ला ते सायन दरम्यानच्या लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने आणि मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याहून CST कडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.