सायन रुग्णालयातून ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस न घेताच पाठवलं घरी

पूजा विचारे
Wednesday, 20 January 2021

सायन रुग्णालयातून नोंदणीकृत वैद्यकीय ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस न घेता काल घरी पाठवण्यात आलं आहे.

मुंबईः सायन रुग्णालयातून नोंदणीकृत वैद्यकीय ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस न घेता काल घरी पाठवण्यात आलं आहे. ऑनलाइन लसीकरणाची नोंदणी होऊन देखील या ८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीचा लाभ आता घेता येणार नाही आहे. 

देशभरात सध्या कोरोनवरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत देखील सव्वा लाख वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पहिल्या फेरीत लसीकरण करण्यात येत आहे.  १० ठिकाणी लसीकरण केंद्र त्यासाठी उभारण्यात आले आहेत. पण नोंदणी होऊन देखील सगळ्याचं कर्मचाऱ्यांना ही लस घेता येईल असं नाही आहे.  सायन रुग्णलयात देखील काल ८ नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना लस न देता घरी पाठवण्यात आलं आहे. या कर्मचाऱ्यांना असलेल्या पूर्व आजारामुळे त्यांना लस देता येणार नाही आहे.

केंद्र सरकारने कोणाला लस द्यावी या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या जारी केल्या आहेत आणि लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन कोविन अॅपमध्ये कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात आहे. कोणाला लस द्यावी आणि कोणाला देऊ नये हे स्पष्ट असलं तरी अशा आजारांची नोंद करण्याची तरतूद कोविन अॅपमध्ये नाही आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यामुळे ज्यांना अॅलर्जी तसेच इतर आजार असलेले लोक लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येत आहेत. लसीकरण केंद्रावर विचारपूस करताना काल ८ जण अॅलर्जी आणि इतर आजार असलेले आढळून आले आहेत. त्यांना लस दिल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकते म्हणून लस न देता त्यांना परत घरी पाठवण्यात आलं असून पुढील अनर्थ टळला आहे.

त्यामुळे एखाद्याची ऑनलाइन नोंदणी जरी लसीकरणासाठी झाली, तरी त्यांना लस दिली जाईलच असं नाही. लसीकरणात नाव आलं तरी केंद्रावर गेल्यानंतर आपल्या आजाराची कल्पना तिथे देणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला लस द्यायची की नाही याचा निर्णय डॉक्टरांना घेता येईल आणि पुढील अनर्थ टाळता येईल.

हेही वाचा- चालकरहित स्वदेशी मेट्रो मुंबईत; बेंगळूरुमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी 

 Sion Hospital 8 registered medical personnel sent home without corona vaccine


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sion Hospital 8 registered medical personnel sent home without corona vaccine