Mumbai : पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल १० ते १५ मिनीटं उशीराने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai local 10 to 15 minutes late Due to heavy rain  Central Railway traffic is disrupted rak94

पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल १० ते १५ मिनीटं उशीराने

मुंबई : मुंबईसह उपनगरात होत असलेल्या मुसाळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीवरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनीटं उशीराने धावत आहेत.

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर काही प्रमाणात पाणी साचल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका मध्य रेल्वेला बसला असून अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर परिणाम झाला असून लोकल ट्रेन १० ते १५ मिनीटं उशिराने धावत आहेत. मेन लाईन, हार्बर मार्गावर देखील पाऊस असून तरीही सर्व मार्गावर ट्रेन्स सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या सेक्शन मध्ये लोकल ट्रेन्स उशिराने धावत आहेत.

मुंबईसह उपनगरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आणि याचा परिणाम म्हणून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. संध्याकाळची वेळ असल्याने कामावरून घराकडे निघालेल्या नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Mumbai Local 10 To 15 Minutes Late Due To Heavy Rain Central Railway Traffic Is Disrupted

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..