Mumbai Local 17 hours Megablock
ESakal
मुंबई
Mumbai Local Megablock: ‘एल्फिन्स्टन’ पाडण्यासाठी १७ तासांचा मेगाब्लॉक! लोकलसह मेल-एक्स्प्रेसची वाहतूक बंद, पण कधी? जाणून घ्या तारीख
Elphinstone Bridge Construction: एल्फिन्स्टन पूल आता पाडकामासाठी मध्य रेल्वेवर १७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
Mumbai Local Megablock: ब्रिटिश काळापासून उभा असलेला एल्फिन्स्टन पूल आता पाडकामाच्या अंतिम टप्प्यात आला आहे. महारेल आणि मध्य रेल्वे यांच्यात झालेल्या ताज्या चर्चेनुसार पहिला मेगाब्लॉक १७ तासांचा घेण्याचे ठरले आहे. सुरुवातीला २० तासांचा ब्लॉक मागितला होता; पण मध्य रेल्वेने तो कमी करीत १७ तासांवर एकमत केले. हा ब्लॉक डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवारी रात्री घेण्याची शक्यता आहे.

