
मुंबई : मुंबईची लोकल ही या शहराच्या जीवनवाहिनीपेक्षा काही कमी नाही. मात्र, या धावत्या लोकल गाड्यांमध्ये होणारे अपघात आजही चिंतेचा विषय ठरत आहे. जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत एकूण ९२२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू उपनगरी रेल्वेमार्गावर झाला आहे. २०२४ मध्ये याच कालावधीत ही संख्या १,००३ इतकी होती. मृत्यूंच्या संख्येत थोडीशी घट झाली असली तरीही परिस्थिती अजूनही गंभीर आहे.