Mumbai Local : डहाणू लोकल सेवा वाढवण्यात याव्यात ; डहाणूकरांची मागणी

Mumbai Local : सकाळी ७.०५ ची डहाणू- विरार लोकल पूर्ववत करावी, सौराष्ट्र एक्सप्रेसच्या जुन्या वेळेत बोरिवली येथून डहाणू लोकल सुरू करावी, दुपारी १२.२० ते १.२० च्या दरम्यान विरार येथून अतिरिक्त डहाणू लोकल सुरू करावी, सकाळी ९.३७ ची डहाणू विरार लोकल अंधेरी ते चर्चगेट पर्यंत विस्तारित करावी.
Mumbai News
Mumbai Newsesakal

डहाणू, वैतरणा उपनगरी विभागातील समस्या सोडवाव्यात, डहाणू लोकल सेवा वाढवण्यात याव्यात; तसेच काही सेवांचे विस्तारीकरण करावे, यासाठी भाजप प्रवासी रेल्वे प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक कैलास वर्मा यांनी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून चर्चा केली. या वेळी सदानंद पावगी, संकेत ठाकूर उपस्थित होते.

डहाणू वैतरणा उपनगरी विभागात लोकसंख्येच्या तुलनेत सेवा अतिशय कमी आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गर्दीच्या वेळी परिस्थिती आणखी विकट होते. यासाठी डहाणू लोकल वाढवण्यात याव्यात. काही डहाणू-विरार लोकलचे बोरिवली ते चर्चगेट दरम्यान विस्तारीकरण करावेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी डहाणू लोकल बाजूला काढू नये, अशा मागण्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनास देण्यात आले.

Mumbai News
Mumbai Local: मुंबई लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय!

सकाळी ७.०५ ची डहाणू- विरार लोकल पूर्ववत करावी, सौराष्ट्र एक्सप्रेसच्या जुन्या वेळेत बोरिवली येथून डहाणू लोकल सुरू करावी, दुपारी १२.२० ते १.२० च्या दरम्यान विरार येथून अतिरिक्त डहाणू लोकल सुरू करावी, सकाळी ९.३७ ची डहाणू विरार लोकल अंधेरी ते चर्चगेट पर्यंत विस्तारित करावी.

सकाळी १०.१० ते ११.३५ च्या डहाणू-विरार अतिरिक्त लोकल सुरू करावी, संध्याकाळी ६.२५ च्या दरम्यान हाम बोईसर-विरार लोकल सुरू करावी, पचटि सकाळी ४ वाजता डहाणू-चर्चगेट लोकल सुरू करावी, अशा मागण्या या ४० निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Mumbai News
Mumbai-Goa Highway : मुंबईहून कोकणात देवदर्शनासाठी निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात; 10 भाविक गंभीररित्या जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com