
Mumbai News: ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे ते कोपरखैरणे आणि ठाणे स्थानकात झालेल्या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे शुक्रवारी (ता. ३) लोकलसेवा काही वेळ विस्कळित झाली होती.
या घटनेमुळे पनवेल, वाशी आणि नेरूळकडून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडून प्रवाशांचा खोळंबा झाला. दिवसभरात या मार्गावरील चार लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.