
मुंबई: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन दरम्यान प्रवास करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीकडे पाहत एका विकृत तरुणाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केली आहे.