Mumbai Local: मध्यरेल्वेचा आज मेगा ब्लॉक; जाणून घ्या आजचे वेळापत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local: मध्यरेल्वेचा आज मेगा ब्लॉक; जाणून घ्या आजचे वेळापत्रक

Mumbai Local: मध्यरेल्वेचा आज मेगा ब्लॉक; जाणून घ्या आजचे वेळापत्रक

मुंबई : तांत्रिक आणि दुरूस्तीच्या कारणास्तव मुंबईत आज मध्यरेल्वेचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात मध्यरेल्वेने काही बदल झाले आहेत. यामुळे नागरिकांची आणि प्रवाशांची गैरसोय होणार असून बदलणाऱ्या गाड्याच्या वेळा आणि वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.

(Mumbai Local Mega block New Timetable)

कोणत्या मार्गावर होणार परिणाम

 • माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन

 • CSMT ते चुनाभट्टी, वांद्रे डाऊन

 • CSMT वडाळा रोडवरून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणारा मार्ग बंद असेल

 • CSMTवरून वांद्रे, गोरेगाव मार्ग बंद राहील

 • वाशी, बेलापूर, पनवेल येथून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या सकाळी १० ते दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत बंद राहतील

 • वांद्रे गोरेगाव येथून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या सकाळी १०.४५ ते ५.१५ पर्यंत बंद राहतील

 • पनवेल आणि कुर्ला यादरम्यान विशेष रेल्वे सेवा देण्यात येईल

 • यादरम्यान प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवासाची परवानगी

 • सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन स्लो मार्गावरील गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकादरम्यान वळवल्या जातील (वेळ सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८)

 • गाड्या १५ मिनिटे उशिराने सुटतील

 • कल्याणहून सुटणाऱ्या स्लो गाड्या ठाणे ते माटुंगा दरम्यान वळवण्यात येतील. त्या ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील

टॅग्स :Mumbai NewsLocal Train