
Mumbai News: माहीम ते वांद्रे रेल्वे स्थानकांदरम्यानच्या मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी २४ आणि २५ जानेवारीच्या रात्री विशेष ब्लॉक आहे. या ब्लॉकचा पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरी लोकलच्या ४२७ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या वांद्रे आणि माहीम स्थानकांदरम्यान मिठी नदीवरील स्क्रू ब्रिज आहे. ब्रिटिशकालीन पुलाच्या सहापैकी एका खांबाचे पश्चिम रेल्वेकडून मजबुतीकरण केले जाणार आहे. या कामासाठी शुक्रवारी (ता. २४) रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर रात्री १२.३० ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असल्याने १२७ लोकल पूर्णत: रद्द, तर ६० लोकल अंशतः रद्द आहेत.