Mumbai Local MegablockESakal
मुंबई
Mumbai Local Megablock: रविवारी लोकल प्लॅनिंग? पण हार्बर-पश्चिमवर ब्रेक, मध्य रेल्वेवर ग्रीन सिग्नल! वेळापत्रक तपासा
Mumbai Local Update: रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीची विविध कामे हाती घेतली आहेत. यामुळे मुंबईतील रेल्वे मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : दुरुस्तीची विविध कामे करण्यासाठी रेल्वेच्या पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी (ता. १२) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण स्थानकांदरम्यान कोणताही मेगाब्लॉक राहणार नाही.

