
मुंबई : श्रावण महिन्याच्या पहिला सोमवार तसेच नागपंचमीसारख्या पारंपरिक सणाच्या खरेदीसाठी रविवारी (ता.२७) मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवास केला. मात्र, नियोजित ‘मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचा प्रवास अक्षरशः रखडला. मध्य आणि हार्बर मार्गावरील सेवांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हजारो प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.