Mumbai Local News: रविवारी मेगाब्लॉक! कुठे, कधी, कसा? वाचा एका क्लिकवर!

Mumbai Latest Update : ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
Mumbai Local News:  रविवारी मेगाब्लॉक! कुठे, कधी, कसा? वाचा एका क्लिकवर!
Updated on

Mumbai Local News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी रविवारी (ता. २७) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग, तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी ते अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी तिन्ही मार्गांवरील प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वे

कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत

परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, तर ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com