
मुंबई : उपनगरी रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवारी (ता. १९) विद्याविहार ते ठाणे यादरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गांवर आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रेदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला ते पनवेलदरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे.