Mumbai: मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलसेवा विस्कळित झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. .मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ६ वाजून २३ मिनिटांच्या सुमारास टिटवाळा स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. यामुळे लोकलचा विद्युत पुरवठा खंडित झाला. परिणामी कल्याण ते इगतपुरी तसेच बदलापूर ते लोणावळा मार्गावरील सर्व गाड्या जागेवरच रखडल्या...शनिवारी (ता.१४) पिक अवर्समध्ये झालेल्या या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्यांमुळे गाड्यांमध्ये गर्दी वाढली होती. दरम्यान, या बिघाडाची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले. .सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर लोकलसेवा पुन्हा सुरू झाली. ही घटना प्रवाशांसाठी खूप अडचणीची ठरला, कारण कामावर निघालेल्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता आले नाही.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.