
माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान मिठी नदीच्या पुलाच्या कामामुळे 24-25 आणि 25-26 जानेवारीच्या रात्री पश्चिम रेल्वेकडून 275 लोकल गाड्या रद्द केल्या आहेत. हा ब्लॉक रात्री 11 ते सकाळी 7.30 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झाले आहे. सकाळपासून पश्चिम रेल्वेच्या मोठ्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.