
मुंबई : मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 17 डिसेंबरपासून एसी लोकल सुरू झाली. मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे एसी लोकल रिकामी धावत होती. मात्र 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना प्रवाशांना लोकल प्रवासात मुभा दिल्यामुळे लोकलची प्रवासी संख्या झपाट्याने वाढू लागली. मागील सहा दिवसात दीड लाखांपेक्षा जास्त रुपयांचा महसूल एसी लोकलमधून मिळाला आहे.
मध्य रेल्वे मार्गावर दुसरी एसी लोकल 17 डिसेंबर 2020 पासून सीएसएमटी ते कल्याण मार्गावर धावू लागली होती. नॉन एसी लोकलच्या दहा फेऱ्या रद्द करून त्याजागी एसी लोकलच्या 10 फेऱ्या सुरू केल्या होत्या. मात्र यावेळी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि राज्य सरकारने मान्यता दिलेल्या 20 क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा देण्यात आलेली होती. त्यामुळे एसी लोकलला प्रतिसाद कमी मिळत होता.
मात्र आता 1 फेब्रुवारी पासून मर्यादित वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासात मुभा दिल्यामुळे प्रवासी संख्या झपाट्याने वाढलेली आहे. त्यामुळे एसी लोकलची प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात 1 हजार 245 तिकीट आणि 18 हजार 557 पासेसची विक्री झाली असून 7 लाख 52 हजार 55 रुपये महसूल मध्य रेल्वेला मिळालेला होता. तर, आता 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरू केल्यामुळे मागील सहा दिवसात 158 तिकीट आणि 3 हजार 983 पासची विक्री झालेली आहे.
या माध्यमातून 1 लाख 50 हजार 343 रुपयाचा महसूल गोळा केलेला आहे, असा एकूण 9 लाख 2 हजार 398 रुपयांचा महसूल वाढला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
mumbai local news in last six days ac locals generated more than one and half lac revenue
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.