
Mumbai Local News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रूळ दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १२) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर.
तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरूळ अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर त्याचा परिणाम जाणवणार आहे.