Mumbai Local News: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

Mumbai Local News: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

Mumbai Local News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, ५ मे २०२४ रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी- चुनाभट्टी -वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणातही मेगाब्लॉक नसणार आहे.

Mumbai Local News: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !
Mumbai Local Crime: विषारी इजेंक्शन टोचून गर्दुल्यांनी घेतला पोलीसाचा बळी

मध्य रेल्व -

कुठे- माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी- सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

हार्बर मार्ग-

कुठे- सीएसएमटी ते चुनाभट्टी / बांद्रा अप आणि डाउन मार्गावर

कधी- सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यत

परिणाम-

ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि बांद्रा-गोरेगाव दरम्यानची लोकल वाहतूक पुर्णपणे बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांकरिता कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन पनवेल करिता दर २० मिनिटांनी स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी रविवारी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करु शकतात.

Mumbai Local News: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !
Mumbai Local News: ..तर चर्चगेट स्थानकावर येणार जप्ती? वाचा नक्की काय आहे प्रकरण 

पश्चिम रेल्वे -

कुठे - मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी - रविवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४. १५ वाजेपर्यत

ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी ५ मे २०२४ रोजी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही

Mumbai Local News: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !
Mumbai Local News: लोकलच्या वेगमर्यादेमुळे हार्बरवासीयांचे हाल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com