
latest Railway News: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण रेल्वेसेवा सुरू झाली. त्यामुळे उरणकरांचा प्रवास अतिजलद झाला आहे. त्यामुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे; मात्र लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने उरणकरांची परवड होत आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या निदान सकाळी व संध्याकाळी तरी वाढवून मिळाव्यात, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.
उरणकरांना प्रतीक्षा असलेली उरण ते नेरूळ, तसेच उरण ते बेलापूर लोकल रेल्वे १२ जानेवारी २०२४ उरणकरांच्या मागणीनुसार सुरू झाली. उरण- नेरूळ व उरण-बेलापूर लोकल ट्रेन सुरू झाल्याने उरणकरांचा पनवेल, नवी मुंबई ते मुंबई प्रवास जलद झाला, तर उरणचा औद्योगिक विकास झाल्याने नोकऱ्यांची संख्या वाढली आहे.