
Navi Mumbai Latest News: दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्येक रविवारी व सुट्टीच्या दिवशी रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये असंतोष वाढत आहे. प्रवाशांचा हा असंतोष रेल्वे प्रशासनासमोर मांडण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने त्याची दखल न घेतल्यास रेल्वेच्या मेगाब्लॉकविरोधात जनतेत जनजागरण करून तीव्र आंदोलन उभारण्याचेदेखील पक्षाने जाहीर केले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नवी मुंबई तालुक्याचे दुसरे अधिवेशन नुकतेच सीबीडी बेलापूर येथील आग्रोळी येथील बी. टी. रणदिवे सभागृहात पार पडले.