mumbai : नारळाच्या रसीने अडवली लोकलची वाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

local

mumbai : नारळाच्या रसीने अडवली लोकलची वाट

मुंबई : मध्य रेल्वेच्या मस्जिद स्थानकादरम्या ओव्हरहेड वायरमध्ये नारळाची रसी अडकल्याने ऐन सकाळी हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेच्या लोकलची वाहतूक रखडली होती. त्यांच्या फटका प्रवाशाना बसला आहे.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते मस्जिद स्थानकादरम्यान बुधवारी (ता.२४) सकाळी ७.११ वाजताच्या सुमारास अप दिशेच्या ओव्हर हेड वायरवरमध्ये नारळाची रसी अडकून पडली होती. त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या मोटरमॅन जागीच लोकल थाबवून यांची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वे कर्मचारी पोहचून सुरक्षितपणे ओव्हर हेड वायरमधून अडकलेली नारळाची रसी काढण्यात आली. त्यानंतर साधरणात ७. ३० वाजताचा सुमारास अप दिशेची हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली; मात्र, या घटनेमुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीला मोठा फटका बसला होता.

एकामागेएक सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल ट्रेन खोळंबल्या होता. परिणामी अनेक प्रवासी लोकलमधून उतरून सीएसएमटी आणि मस्जिद स्थानक गाठत असल्याचे चित्र सकाळी दिसून आले. त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांनचे चागले हाल झाले आहे. विशेष म्हणजे या आठवड्याला संपायाला चार दिवस बाकी असून हार्बर मार्गावरील दुसरी घडल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Mumbai Local Route Blocked Coconut Sap

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..