मुंबईत मुब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून पडल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर काही जण जखमी झाले होते. आता या घटनेनंतर लोकलच्या दरवाजात बॅग घेऊन उभा राहण्यास बंदी घालण्यात आलीय. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीसांनी गर्दीवर नियंत्रणासाठी मोठी पावलं उचलली आहेत. संध्याकाळी गर्दीच्या वेळेत मुख्य स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त जवान तैनात करण्यात येतील.