esakal | कोरोना बातम्यांवरुन बाळा नांदगावकरांचं चॅनल्सना महत्त्वाचं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

बाळा नांदगावकर

कोरोना बातम्यांवरुन बाळा नांदगावकरांचं चॅनल्सना महत्त्वाचं आवाहन

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाची लागण झालेले बहुतांश रुग्ण लक्षण विरहित आहेत. काही रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असली तरी स्थिती गंभीर असलेल्या रुग्णांचे प्रमाण काही टक्केच आहे. ऑक्सिजन, वेंटिलेटर्स लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असले, तरी यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. कारण वैद्यकीय साधनांबरोबर डॉक्टर्स, नर्स कुठून आणयच्या हा एक प्रश्न आहे.

हेही वाचा: 'देशात युद्धासारखी स्थिती...' संजय राऊतांनी केली मोठी मागणी

महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांकडून कोरोनामुळे राज्यात नेमकी कशी स्थिती आहे, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला किती वेळ लागतोय, या बातम्या दिल्या जात आहेत. सततच्या या बातम्यांमुळे नागरिकांच्या मनात भीती तर वाढतच आहे, पण त्याचबरोबर एक नकारात्मकतेची भावना निर्माण होत असल्याचा सर्वसामान्यांचा सूर आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी "रामनवमीचा एक दिवस कोरोना सोडून बाकी सकारात्मक बातम्या दाखवाव्यात" असे वृत्तवाहिन्यांना आवाहन केले आहे.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन घातक असला, तरी या आजारातून बऱ्या होणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. ज्येष्ठ नागरीक आणि सहव्याधी असणाऱ्या रुग्णांसाठी कोरोना जास्त घातक ठरतोय. विविध वृत्तवाहिन्यांवर दिवसभर कोरोनासंबंधी बातम्यांचे वृत्तांकन सुरु असते.