
मुंबईतील लाखो लोकल प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे! मध्य रेल्वेने (Central Railway - CR) नव्या ‘लकी यात्री योजना’अंतर्गत प्रवाशांना दररोज १० हजार रुपये आणि आठवड्याला ५० हजार रुपये जिंकण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे प्रवक्ते स्वप्नील निळे यांनी सांगितले की, ही योजना पुढील आठवड्यापासून सुरू होणार असून, आठ आठवड्यांसाठी चालवली जाणार आहे.