

Mumbai Local Megablock
ESakal
मुंबई : दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉकचे नियोजन केल्याने मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. मार्गावरील माटुंगा ते मुलुंडदरम्यान, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान दोन्ही दिशांकडील मार्गिकांवर दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.