Mumbai Local Megablock: प्रवाशांची गैरसोय होणार, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; वाचा वेळापत्रक

Railway Line Megablock: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवार, ८ मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाहा कसे असेल वेळापत्रक...
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on

मुंबई : उपनगरी रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ८) रेल्वेच्या मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते  मुलुंड अप आणि डाऊन जलद  मार्गावर, तर कुर्ला ते वाशी  अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com